Advertisement

योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक

नवाब मलिक (nawab malik) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर असल्याचं मलिक म्हणाले आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर असल्याचं मलिक म्हणाले आहेत.

हेही वाचा- ‘या’ प्रकरणात फडणवीस यांना जामीन मंजूर

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधता उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह देशातील अनेक भागात हिंसक आंदोलन होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये (lucknow) झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. या हिंसक आंदोलनात २२ लोकांचा मृत्यू झाल्याचं उत्तर प्रदेश सरकारने (up government) म्हटलं होतं.

त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं. आंदोनात ठार झालेल्यापैकी कोणीही पोलिसांच्या गोळीने मरण पावलेलं नाही. मृत्यू झालेले सर्वजण हिंसा घडविणाऱ्यांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत. जर कोणी लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरत असेल, तर तो मरतो किंवा पोलीस कर्मचारी मरतो. शेवटी मरायला आले असतील, तर जिवंत कसे जातील, असं योगी म्हणाले होते.

हेही वाचा- महाराष्ट्र सदनात धक्काबुक्की, ‘त्या’ अधिकाऱ्यांचं निलंबन

योगी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, ''मरायला आले असतील तर जिवंत कसे जातील हे योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारे खपवून घेतलं जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही लोकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. असं असूनही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. योगी आदित्यनाथ हे जनरल डायरसारखे वागत आहेत, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.'' 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा