Advertisement

महाराष्ट्र सदनात धक्काबुक्की, ‘त्या’ अधिकाऱ्यांचं निलंबन

विजय कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदनात धक्काबुक्की, ‘त्या’ अधिकाऱ्यांचं निलंबन
SHARES

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन (New delhi maharashtra sadan) इथं आयोजित शिवजयंती (shiv jayanti) कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजिमेंटमधील जवानांसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा- शिवथाळींची संख्या दुप्पट, ३६ हजार थाळ्यांची रोज विक्री

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दरवर्षी शिवजयंतीच्या (shiv jayanti) निमित्ताने खासदार संभाजीराजे भोसले विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी इतर कुठल्याही कार्यक्रमाला न जाणारे गोरखा रेजिमेंटच्या (gorkha regiment band) जवानाचं बँड पथक पहाटे ६ वाजल्यापासून महाराष्ट्र सदनात (maharashtra sadan) उपस्थित होते. 

या जवानांची जेवणाची व्यवस्था कॅन्टीनमध्ये (canteen) करण्यात आली होती. त्यांच्यासाठी ताटं देखील वाढून ठेवण्यात आली होती. मात्र काही जवान दुपारी जेवणासाठी कॅन्टीनमध्ये गेल्यावर हा व्हिआयपी रुम आहे. इथं तुम्हाला जेवता येणार नाही. तुमची जेवणाची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे. असं म्हणत  महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर (Vijay Kayarkar Asstt. Resident Commissioner, Protocol) यांनी या जवानांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं यावेळी धक्काबुक्की झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कायरकर यांच्या वर्तनावर टीका करण्यात आली होती.

जवानांसोबत झालेल्या या गैरव्यवहाराची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निवासी आयुक्तावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.  

त्यानुसार कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांच्या मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आलं आहे. कायरकर हे महाराष्ट्र सदनला प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: तपास राज्याकडेच राहणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

 

संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा