Advertisement

शिवथाळींची संख्या दुप्पट, ३६ हजार थाळ्यांची रोज विक्री

सद्यस्थितीत राज्यात दररोज १८ हजार शिवभोजन थाळ्यांची विक्री होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता थाळ्यांची संख्या वाढवून ३६ हजार करण्यात आली आहे.

शिवथाळींची संख्या दुप्पट, ३६ हजार थाळ्यांची रोज विक्री
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीला (Shiv bhojan thali) राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या थाळींची संख्या वाढवून दुप्पट करण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. या थाळींच्या अपुऱ्या संख्येवरून भाजपने (bjp) याआधी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारवर जोरदार टीका केली होती.

हेही वाचा- दीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळीच्या (Shiv bhojan thali) वाढत्या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाला (food and supply department) दिले होते. सद्यस्थितीत राज्यात दररोज १८ हजार शिवभोजन थाळ्यांची विक्री होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता थाळ्यांची संख्या वाढवून ३६ हजार करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रावर दररोज कमाल १५० थाळ्या उपलब्ध व्हायच्या, ही संख्या वाढवून २०० थाळ्या करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केले आहेत. दररोज १ लाखापर्यंत शिवभोजन थाळया उपलब्ध करुन देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवभोजन थाळी (Shiv bhojan thali) योजनेला राज्यभरात सुरूवात करण्यात आली होती. अवघ्या १० रुपयांत मिळणाऱ्या या थाळीत भात, भाजी, वरण आणि चपाती असे ४ पदार्थ दिले जातात. शिवभोजन थाळीची विक्री करण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून १२६ शिवभोजन केंद्र (Shiv bhojan centers) सुरू करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ही योजना राबवण्यात येते.  

हेही वाचा- शिवभोजन थाळी विकायचीय? मग या अटी वाचा..

शिवसेनेने (shiv sena) आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात (menofesto) राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार शिवसेना सत्तेत येताच या योजनेची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असताना इतक्या तुटपुंज्या पातळीवर ही योजना सुरू करणं म्हणजे गरिबांची थट्टा आहे, अशा शब्दांत भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या योजनेवर टीका केली होती. 

काही दिवसांपूर्वीच भाजपने पंढरपूरमध्ये (pandharpur) दीनदयाळ थाळी (din dayal thali) योजनेची सुरूवात करत शिवसेनेच्या थाळीला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्राधान्याने ही थाळी सुरु करण्यात आली आहे. या दीन दयाळ थाळीत ३ चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचं कांदा, लींबू देण्यात येतो.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा