Advertisement

दीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी

महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) अनोखा उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ आतापर्यंत राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली.

दीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी
SHARES

महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) अनोखा उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ आतापर्यंत राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. या माहितीवरून शिवभोजन (shiv bhojan) थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचंही दिसून येत आहे. शिवभोजन केंद्राचा विस्तार झाल्यानंतर या थाळीचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशीही माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडी सरकारची (maha vikas aghadi) महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजना प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून २६ जानेवारी रोजी राज्यभरात सुरू करण्यात आली होती. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन (food) उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. 

हेही वाचा- दुसऱ्या दिवशी १३,५०० शिवभोजन थाळ्यांचं वाटप

राज्यात १२६ शिवभोजन केंद्रे (shiv bhojan centers) सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयांत (food in 10 rupees) जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना (woman welfare group) हे काम देण्यात येत आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणं अपेक्षित आहे.

 

हेही वाचा-  शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डसक्ती?, मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा

'राज्यातील गरीब, गरजूंना सवलतीत जेवण उपलब्ध करून देणाऱ्या 'शिवभोजन' योजनेची राज्यात काटेकोर, व्यवस्थित अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल', असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

थाळ्यांच्या अपुऱ्या संख्येचा उल्लेख करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळी. तर, नांदेडमध्ये फक्त ५०० लोकांना जेवण, ही गरिबांची थट्टा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. गुरुद्वारामध्ये (gurudwara langar) यापेक्षाही जास्त लोकं जेवतात, तेही फुकट.. अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली होती. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा