Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

दुसऱ्या दिवशी १३,५०० शिवभोजन थाळ्यांचं वाटप

महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजनेला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० थाळ्यांचं वाटप करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी १३,५०० शिवभोजन थाळ्यांचं वाटप
SHARE

महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजनेला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० थाळ्यांचं वाटप करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राज्यभरात ही योजना सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन (food) उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. 

हेही वाचा- १०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक

राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे (shiv bhojan centers) सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयांत (food in 10 rupees) जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी ११, ४१७ जणांनी या भोजनाचा लाभ घेतला होता. 

मात्र, थाळ्यांच्या अपुऱ्या संख्येचा उल्लेख करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळी. तर, नांदेडमध्ये फक्त ५०० लोकांना जेवण, ही गरिबांची थट्टा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. तर, गुरुद्वारामध्ये (gurudwara langar) यापेक्षाही जास्त लोकं जेवतात, तेही फुकट.. अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली. 

हेही वाचा- यापेक्षा जास्त लोकं लंगरमध्ये जेवतात, ते पण फुकट, ‘शिवथाळी’वरून फडणवीसांचं टीकास्त्र

प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना (woman welfare group) हे काम देण्यात येत आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणं अपेक्षित आहे. 

गोरगरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळावं हाच या याजनेमागील उद्देश आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असं आवाहन उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी केलं आहे.

संबंधित विषय
संबंधित बातम्या