Advertisement

यापेक्षा जास्त लोकं लंगरमध्ये जेवतात, ते पण फुकट, ‘शिवथाळी’वरून फडणवीसांचं टीकास्त्र

ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

यापेक्षा जास्त लोकं लंगरमध्ये जेवतात, ते पण फुकट, ‘शिवथाळी’वरून फडणवीसांचं टीकास्त्र
SHARES

ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘शिवभोजन थाळी’ योजनेअंतर्गत जितके लोकं जेवले त्यापेक्षा जास्त लोकं तर रोज गुरूद्वारातील लंगरमध्ये जेवतात, ते पण मोफत असं फडणवीस म्हणाले.

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राज्यभरात शिवभोजन थाळी (shiv bhojan thali) योजनेला सुरूवात करण्यात आली. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन (food) उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. 

हेही वाचा- १०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक

राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे (shiv bhojan centers) सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयांत (food in 10 rupees) जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी ११, ४१७ जणांनी या भोजनाचा लाभ घेतला.

मात्र, थाळ्यांच्या अपुऱ्या संख्येचा उल्लेख करत फडणवीस (Devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळी. तर, नांदेडमध्ये फक्त ५०० लोकांना जेवण, ही गरिबांची थट्टा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. तर, गुरुद्वारामध्ये (gurudwara langar) यापेक्षाही जास्त लोकं जेवतात, तेही फुकट.. अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली. 

हेही वाचा- शिवभोजन योजनेसाठी ६.४८ कोटीचे अनुदान

राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने पात्र ठरवलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, मेस मध्ये ही थाळी केवळ १० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येईल. १० रुपयांवरील उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधी हे अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येईल. ते शिवभोजन ॲपमध्ये भरलेल्या माहितीची परिगणना करून संबंधितांना हे अनुदान दर १५ दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात येईल. ही भोजनालये दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत राहणार असून भोजनालयात एकाच वेळी किमान २५ व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. एका भोजनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा