Advertisement

नाहीतर, मुख्यमंत्र्यांना कोंडून ठेवू, तृप्ती देसाईंचा इशारा

इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना मंत्रालयातील केबिनमध्ये कोंडून बाहेरून टाळं लावून घेऊ, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

नाहीतर, मुख्यमंत्र्यांना कोंडून ठेवू, तृप्ती देसाईंचा इशारा
SHARES

महिलांविरोधात अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना मंत्रालयातील केबिनमध्ये कोंडून बाहेरून टाळं लावून घेऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिवाय महिलांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदुरीकरांविरोधात कठोर कारवाई करावी, असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

हेही वाचा- औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती

तृप्ती देसाई यांनी पुणे पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांवर (indurikar maharaj) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यामाशी संवाद साधताना त्या म्हणाल्या इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून सातत्याने त्यातत्याने महिलांविरोधी वक्तव्य करत त्यांचा अवमान करत असतात. जेव्हापासून भूमाता ब्रिगेडने त्यांच्याविरोधात गुन्हा (fir) दाखल करण्याची मागणी केली आहे, तेव्हापासून इंदुरीकर यांच्या समर्थकांकडून आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने इंदुरीकरांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि पीसीपीएनडीटी (pcpndt) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. नाहीतर अकोल्याला जाऊन इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

येत्या दोन ते चार दिवसांत इंदुरीकरांवर (indurikar maharaj) गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलीस अधिक्षकांनी (Superintendent of Police) दिलं आहे. हे आश्वासन न पाळल्यास तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यांच्या किर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका व्हायला लागली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह भूमाता ब्रिगेडने त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली. 

हेही वाचा- ‘त्यांची’ तपश्चर्या वाया घालवू नका, भाजपचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

दरम्यान इंदुरीकर महाराजांनी एक पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. त्यांचं पत्र पुढीलप्रमाणे:

महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिलावर्ग.

आज गत आठ दिवसांपासून माझ्या किर्तणरूपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरूपी सेवेत समाज प्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरूपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धींगत व्यावे ही सदिच्छा!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा