Advertisement

‘त्यांची’ तपश्चर्या वाया घालवू नका, भाजपचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी बाजू घेतली आहे.

‘त्यांची’ तपश्चर्या वाया घालवू नका, भाजपचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
SHARES

“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं किर्तनादरम्यान वक्तव्य करून वादात सापडलेले प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (indurikar maharaj) यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी बाजू घेतली आहे. 

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची समांतर चौकशी, राष्ट्रवादी हट्टाला पेटली

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी पक्षाची भूमिका मांडली. पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराजांची (indurikar maharaj) कीर्तनं (kirtan) जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होतं. इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, भाजपा त्यांच्या पाठिशी आहे. दिवसरात्र किर्तनं करून तो माणूस समाज प्रबोधनाचं काम करतोय. एका वाक्यानं व्यक्ती खराब होत नाही. त्यामुळे केवळ एका वाक्यानं अशा माणसाची तपश्चर्या घालवू नका, असं आवाहन पाटील यांनी प्रसार माध्यमांना केलं.

सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी (indurikar maharaj) केलं हाेतं. त्यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (pcpndt) कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

हेही वाचा- हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान 

एवढंच नाही, तर अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर (PCPNDT) च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. 

या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी ((indurikar maharaj)) एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकात त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणीही मोर्चा, आंदोलन काढू नये. वारकरी हा शांतताप्रिय संप्रदाय आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं काही करू नये. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी आपण शांतता राखून सहकार्य करावं ही विनंती, त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

हेही वाचा- राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाने दिले आदेश


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा