Advertisement

भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवारांचीच चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp president sharad pawar) यांना समन्स पाठवून त्यांची भीमा-काेरेगाव हिंसाचार (Bhima koregaon violence) प्रकरणी चौकशी करण्याची मागणी अॅड. प्रदीप गावंडे यांनी चौकशी आयोगाकडे (inquiry commission) केली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवारांचीच चौकशी करा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp president sharad pawar) यांना समन्स पाठवून त्यांची भीमा-काेरेगाव हिंसाचार (Bhima koregaon violence) प्रकरणी चौकशी करण्याची मागणी अॅड. प्रदीप गावंडे यांनी चौकशी आयोगाकडे (inquiry commission) केली आहे. शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे  आणि पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.

हेही वाचा- वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi) स्थापन झाल्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांना पत्र लिहत भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची फेर चौकशी करण्याची मागणी केली होती. तसंच मुख्यमंत्र्यांनी एल्गार प्रकरणाची चौकशी एनआयएच्या ताब्यात दिल्यानंतर नाराज झालेल्या पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) बैठक घेऊन विशेष तपास पथकाद्वारे (SIT) भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी समांतर चौकशी करण्यावर ठाम राहण्याचे निर्देश दिले होते. 

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, भीमा-कोरेगाव (Bhima koregaon) हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं. 

हेही वाचा- नाहीतर, मुख्यमंत्र्यांना कोंडून ठेवू, तृप्ती देसाईंचा इशारा

त्यावर प्रश्न उपस्थित करताना पवारांना या दंगलीबद्दलची माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल चौकशी आयोगाने पवार यांना समन्स (summons) पाठवून त्यांची तातडीनं साक्ष घ्यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावंडे यांनी केली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा