मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा- अशोक चव्हाण

मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळलेला असताना राज्य सरकारचं त्याकडे लक्ष नाहीय. याप्रश्नी आता चर्चेची नाही, तर कृतीची गरज आहे अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी केली.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसकडून एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसने विशेष अधिवेशनाची मागणी उचलून धरली आहे.

बंदला कुणाचा पाठिंबा?

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई बंदला काँग्रेससह शिवसेना आणि अन्य पक्षांनी पाठिंबा दिला. पण प्रत्यक्षात बंदमध्ये कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता. मराठा आरक्षण चिघळण्याला भाजपा सरकारक जबाबदार असल्याचा आरोप करत चव्हाण यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांनाही टार्गेट केलं.

बेताल वक्तव्यामुळे...

पंढरपूर वारीसंदर्भात मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात आणि त्यात त्यांचे मंत्रीही भर घालतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यामुळंच आंदोलन चिघळल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर अशी बेताल वक्तव्य त्वरीत थांबवावीत, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.


हेही वाचा-

कळंबोलीतील उद्रेकानंतर 'मराठा क्रांती मोर्चा'चा मुंबई बंद स्थगित!

'मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी'


पुढील बातमी
इतर बातम्या