Advertisement

'मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी'

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात महापूजा करून देणार नाही, ही आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. त्यावर पंढरपूरच्या वारीत काही जणांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढं येऊनच माफी मागावी, असा इशारा विरेंद्र पवार यांनी दिला.

'मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी'
SHARES

मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर ५० हून अधिक मूक मोर्चे शांततेत काढून देखील समाजाच्या पदरात मागच्या २ वर्षांत फक्त निराशाच पडली. राज्य सरकार आश्वासन देऊनही आमच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत असल्यानंच या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी 'मूक' मोर्चाचं 'ठोक' मोर्चात रुपांतर करावं लागलं. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात महापूजा करून देणार नाही, ही आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. त्यावर पंढरपूरच्या वारीत काही जणांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढं येऊनच माफी मागावी. अन्यथा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरल्याबद्दल राजीनामा द्यावा अन्यथा अांदोलन तीव्र करू, असा रोखठोक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.


२ वर्षांत प्रश्न 'जैसे थे' च

गेल्या २ वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जनआंदोलन उभारत आहे. मराठा समाजानं मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईसह राज्यभर ५८ मूक मोर्चे काढले. या मोर्चांची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. असं असताना राज्य सरकार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमचा 'मूक' मोर्चा आता 'ठोक' मोर्चा बनला आहे. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून राज्य सरकारही या प्रश्नाकडं लक्ष देत नसल्यानं आरक्षणाचा प्रश्न 'जैसे थे' असल्याचं म्हणत पवार यांनी सरकारवर टीका केली.


बघा, काय म्हणाले विरेंद्र पवार...


मेगाभरती रद्द करा

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना राज्य सरकारनं ७२ हजार पदांची मेगा भरती जाहीर केली. त्यामुळे या भरतीला विरोध करत ही भरती रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. सरकारनं मेगा भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखून ठेवण्यात येतील आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल, असं जाहीर केलं आहे. पण कायदेशीरदृष्ट्या असं आरक्षण ठेवताच येत नाही, हे खोट आश्वासनं आहे, असं म्हणत पवार यांनी मेगा भरती त्वरीत रद्द करण्याची मागणी केली.


प्रत्येक मावळा महत्त्वाचा

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमधील बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा करत पवार यांनी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदेप्रमाणे कुठल्याही आंदोलनर्त्याने टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन केलं. मराठा आंदोलनात प्रत्येक मावळा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, आंदोलनाला मावळ्यांची गरज आहे, असं म्हणत पवारांनी आंदोलकांना आक्रमक न होण्याचं आवाहन केलं.



हेही वाचा-

Live Updates - मराठा क्रांती मोर्चा: मुंबई, ठाण्यातील वाहतूक विस्कळीत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा