टीव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, काँग्रेस करणार तक्रार

लोकसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने टीव्ही मालिकांचा आधार घेतला आहे. टेलिव्हिजनवरील 'भाभीजी घर पर है,' आणि ‘तुझसे है राबता’ या हिंदी मालिकांमधून मोदी सरकारनं आपल्या कामांचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. याप्रकरणी काँग्रेस सोमवारी निवडणूक आयोगाकडं लेखी तक्रार देखील करणार असल्याचं समजतं आहे.

हीन स्तरावरील राजकारण

'भाजपा दिवसेंदिवस हीन पातळीवरील राजकारण करत आहे. आता मालिकांचा उपयोग प्रचारासाठी केला जात आहे. भाजपा भ्रामक तंत्रांचा वापर करीत आहे. निवडणूक आयोगानं स्वतः याची तपासणी केली पाहिजे. परंतु, आता आम्ही त्याची आयोगाकडं तक्रार करणार आहोत,' असं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विटरवरून ट्वीट केलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडं तक्रार

याप्रकरणी, सोमवारी दुपारी २.३० वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांकडं भाजपाचा प्रचार करणाऱ्या या वाहिन्या आणि निर्मिती संस्थांविरोधात तक्रार करणार असल्याचं सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं या वाहिन्या आणि निर्मिती संस्थांविरोधात कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

लोकसभा निवडणुकीसाठी आज ८ उमेदवार भरणार अर्ज

रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची मदत


पुढील बातमी
इतर बातम्या