Advertisement

रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची मदत

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होतं आहे. स्थानकावरील प्रवाशांच्या या गर्दीमुळं दुर्घटना होऊ नये तसंच, या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे सुरक्षा दलाने आपल्याकडील मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची मदत
SHARES

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नवीन पादचारी पूल व जुन्या पादचारी पुलांच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होतं आहे. स्थानकावरील प्रवाशांच्या या गर्दीमुळं दुर्घटना होऊ नये तसंच, या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे सुरक्षा दलाने आपल्याकडील मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.


३०० हून अधिक जवान निवडणुकीसाठी तैनात

पश्चिम व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ३०० पेक्षा जास्त जवान लोकसभा निवडणूक असल्याने महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहे जाणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवासादरम्यान स्थानकांवर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४०० जवान लवकरच मध्य व पश्चिम रेल्वे ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत.

मुंबईतील वांद्रे कलानगर, अंधेरी, माहिम, वसई, मालाड येथील उड्डाणपुलांची व त्यावरील पादचारी मार्गिकेची दुरुस्ती जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, महलक्ष्मी, प्रभादेवी, दादर स्थानकांमधील प्रत्येकी एक पादचारी पूल आणि खार स्थानकातील दोन पादचारी पूल तसंच, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड स्थानकांतील एका पादचारी पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, वांद्रे, खार, माहिम स्थानकात नव्याने पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. पादचारी पुलांची दुरुस्ती आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलांचे बांधकाम हे पावसाळापर्यंत कामे सुरू राहणार असल्यानं प्रवाशांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जादा जवान तैनात करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.हेही वाचा -

लोकसभा निवडणुकीसाठी आज ८ उमेदवार भरणार अर्जRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा