Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी आज ८ उमेदवार भरणार अर्ज

सोमवार हा दिवस मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी नक्की केला आहे. त्यामुळं वाजतगाजत आणि जोरदार शक्तिप्रदर्शन ८ उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी आज ८ उमेदवार भरणार अर्ज
SHARES

लोकसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसंच, उमेदवारांनी देखील आपले अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अशातच, सोमवार हा दिवस मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी नक्की केला आहे. त्यामुळं वाजतगाजत आणि जोरदार शक्तिप्रदर्शन ८ उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत.


अर्ज भरण्याची तयारी

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या जागांसाठी २ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्याव्यतिरीक्त आणखी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिल्यानं युती आणि आघाडीच्या उर्वरित उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.

दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. अरविंद सावंत हे फोर्ट येथील फायर ब्रिगेडपासून मिरवणुकीनं अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत, तर राहुल शेवाळे सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करून अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. त्याचप्रमाणं, उत्तर पूर्वे मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक शक्तिप्रदर्शन करत मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात अर्ज भरणार आहेत.


काँग्रेसचे ५ उमेदवार अर्ज भरणार

उत्तर पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांनी मंगळवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केल्यानं काँग्रेसचे ५ उमेदवार सोमवारी अर्ज भरणार आहेत. मिलिंद देवरा आणि एकनाथ गायकवाड मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम आणि प्रिया दत्त देखील शक्तिप्रदर्शन करत वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर मंगळवारी अर्ज भरणार आहेत.हेही वाचा -

Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement