Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार

उड्डाणपूलावरील सुरक्षेसोबतच समुद्र मार्गेही दहशतवादी उड्डाणपूलाच्या खांबांना धोका पोहचवू शकतात. समुद्र मार्गे पोलिसांच्या बोटीच्या पश्च्यात कुठली ही अनोळखी बोट सी-लिंक मार्गे सहज दादर (शिवाजीपार्क), प्रभादेवी, वरळी, माहिम परिसरात दाखल होऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सी-लिंकच्या सुरक्षेसाठी एमएसआरडीसीच्या मदतीने सी-लिंकखालून ज्या ठिकाणाहून कोळीबांधवांच्या बोटी किनाऱ्याजवळ ये-जा करतात. त्या जागा सोडून सी-लिंकच्या इतर खांबांमधील बोटींचा वावर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार
SHARES

मुंबईची नवी ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सी लिंक’वर रोज लाखोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होते. हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सी-लिंकच्या सुरक्षेकडे मात्र पुरेसं लक्ष देण्यात आले नव्हते. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यानंतर ही सी-लिंकच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांमध्ये उदासिनता असल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळेच मुंबईच्या सी-लिंक खाली समुद्रात आता २४ तास पोलिसांचा जागता पाहरा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या समुद्र सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलिसांनी महत्वाचं पाऊल उचलले आहे. त्यामुळे कुठलीही अनोळखी बोट सी-लिंक खालून जाऊ नये यासाठी सी-लिंकचे पिलर लोखंडी साखळ्यांनी बंद केलं जाणार आहे.  


अशी आहे सुरक्षा

२६/११ च्या दहशतवादी हल्ला हा समुद्र मार्गाने झाला होता. त्यानंतर शहराच्या जवळपास असलेल्या समुद्रातील ७२ लॅडिंग पाॅईंटवर गस्ती वाढवण्यात आली. मात्र सी-लिंकच्या सुरक्षेबाबत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. सी-लिंकच्या सुरक्षेसाठी वरळी कोळीवाडा येथील स्थानिक पोलिस ठाण्यातून प्रत्येकी दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी-लिंकचा विस्तार पाहता ही सुरक्षा अत्यंत तोकडी होती. वरळी-कोळीवाडा भागातून सी-लिंक जवळ असल्याकारणाने सी-लिंकच्या मध्यावर वरळी कोळीवाड्यातून कुणालाही जाता येते. त्यासाठी कुठल्याही विशेष परवानगीची आवश्यकता नव्हती. तसेच सी-लिकंच्या खांबा खालून वरळी-माहिम कोळीबांधवांच्या बोटी ही ये-जा करत असतात. तरी किनारपट्टीवरून कुठली बोट कोळीबांधवांची आणि कुठली अनोळखी याचा अंदाज लावणे त्या दोन पोलिसांना शक्य नव्हते. तसेच या ठिकाणी पोलिसांच्या स्पीड बोटींचा फिरता पहारा असतो. त्यामुळे या बोटी त्या ठिकाणी फक्त काही मिनिटांसाठी वावरत असतात. 


साॅफ्ट टार्गेट

सी-लिंकला बाँम्बने उडवण्यासंदर्भातले अनेक धमकीचे फोन मुंबई पोलिसांजवळ यापूर्वी आले होते. यामार्गे दहशतवादी मुंबईतल्या अनेक महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी एमएसआरडीसीला पत्र लिहून सी-लिंकला धोका असून त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत सुचवले होते. तसंच मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त संजय बर्वे हे राज्यगु प्तचर विभागात कार्यरत असताना त्याच्यांजवळ अशा संशयित धमक्यांची माहिती यायची. त्यात सी-लिंकला उडवण्याचेही अनेक फोन आले होते. त्यानुसार काय उपाय योजना करता येईल याबाबत त्यांनी त्यावेळी एमएसआरडीसीसोबत चर्चा केली होती. त्यानुसार आता त्या गोष्टीची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 


२४ तास गस्त

समुद्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  एमएसआरडीसीने उड्डाणपूलावर ८० कॅमेरे लावलेले आहेत. त्याचबरोबर सी-लिंकवर आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांच्या घटनेनंतर उड्डाणपुलावर  वाहनांना थांबण्यास मनाई केली. मात्र उड्डाणपूलावरील सुरक्षेसोबतच समुद्र मार्गेही दहशतवादी उड्डाणपूलाच्या खांबांना धोका पोहचवू शकतात. समुद्र मार्गे पोलिसांच्या बोटीच्या पश्च्यात कुठली ही अनोळखी बोट सी-लिंक मार्गे सहज दादर (शिवाजीपार्क), प्रभादेवी, वरळी, माहिम परिसरात दाखल होऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सी-लिंकच्या सुरक्षेसाठी एमएसआरडीसीच्या मदतीने सी-लिंकखालून ज्या ठिकाणाहून कोळीबांधवांच्या बोटी किनाऱ्याजवळ ये-जा करतात. त्या जागा सोडून सी-लिंकच्या इतर खांबांमधील बोटींचा वावर  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणाहून कोळीबांधवाच्या बोटी ये-जा करतात. त्या ठिकाणी पोलिस दलात नव्याने दाखल होणार्या ‘ट्राँलर’ बोटीने २४ तास गस्त ठेवण्याचा निर्णय घेतला.  या संदर्भातची माहिती कोळीबांधवांना एमएसआरडीसीने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सी-लिंक खालून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक बोटीवर पोलिसांची नजर राहणार असल्याच्या बातमीला दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे.   


काय झालं  चौक्यांचं

२६/११ च्या हल्यानंतर मुंबईच्या महत्वाच्या समुद्र किनारी पोलिस चौक्या उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र या हल्याला दहा वर्ष उलटून ही अद्याप पोलिसांना चौक्या विनाच गस्त घालावी लागत आहे. वरळीच्या गटाराजवळील स्थानिक मच्छिमारांच्या मालकीच्या जागेवर (मच्छी सुकवण्याच्या खळ्यात) चौकी बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला; पण ही जागा मच्छ‌मिारांच्या मालकीची असल्याने पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर वरळी पोलिसांनी सी-लिंक शेजारीच चौकी बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाठवला. या गोष्टीला कित्येक वर्ष उलटली तरी येथे अद्याप चौक्या बांधण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कधी उघड्यावर तर पावसाळ्यात मच्छिमारांच्या झोपड्यांचा आधार घेऊन पोलिसांना गस्त घालावी लागत आहे. 


पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उचललेल्या पावलांची कोणतिही माहिती अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही. एमएसआरडीसी किंवा पोलिसांनी कोणतीही बैठक आमच्यासोबत घेतलेली नाही. सी-लिंकच्या खांबा खाली अनेक मोठ मोठी दगडे आहेत. त्या ठिकाणाहून बोटी बाहेर पडू शकत नाही. दोन्ही कोळीवाड्यात ५०० बोटी आहेत. त्यासाठी किमान २०० मीटर जागा अपेक्षित असताना. पोलिस एका ठिकाणी ६० मीटर तर दुसऱ्या ठिकाणी १६० मीटर जागा सोडत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाऊले उचलताना दोघांनीही कोळीवाड्यातील मच्छीमार लोकांचे मते ही विश्वासात घ्यावे, मच्छिमारांना अडचणी लक्षात घ्याव्यात.  

हरिशचंद्र नाखवा

चेअरमन, वरळी नाखवा फिशरमन सोसासटी 

हेही वाचा

Exclusive मुंबई पोलिस दलात दाखल होणार ६ नव्या 'ट्राँलर' बोटी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा