भारत का GDP डुबा, तब रसोडे में मोदी जी थे... सचिन सावंत यांचा हल्लाबोल

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाल्याची कबुली केंद्र सरकारनं सोमवारी दिली. पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या 'रसोडे मे कौन था' या कोकिलाबेन स्टाइलनं केंद्रावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुळं रॅप साँगचं विंडबन केलं आहे. 'रसोडे मे मोदी जी थे', असं त्यात म्हटलं आहे. सावंत यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

देशात १९९६ पासून जीडीपीचे आकडे जारी करण्यात येत आहेत. तेव्हापासूनची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक प्रयत्न करीत आहे. रिझर्व्ह बँकेनं अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी मार्चपासून रेपो दरात १.१५ टक्क्यांची कपातही केली आहे.


हेही वाचा

“आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाले पगारावर ठेवले”

मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत, यावर मला बोलायचं नाही- देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी
इतर बातम्या