Advertisement

“आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाले पगारावर ठेवले”

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलं, अशी टीका भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना तसंच काँग्रेसवर केली आहे.

“आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाले पगारावर ठेवले”
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलं, अशी टीका भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना तसंच काँग्रेसवर केली आहे. (bjp leader nilesh rane criticised shiv sena and congress over sushant singh rajput suicide case)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून निलेश राणे सातत्याने महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर आरोप करत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणात नाव आलेला संदीप सिंह आणि भाजपचं कनेक्शन काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आपल्या ट्विटर हँडलवरून निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना तसंच काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

SSR केस मध्ये आदित्यला वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर उचललं. रोज उठून काँग्रेसवाले संदीप सिंह आणि BJP चं कनेक्शन शोधतायत. मीडियावाले पण दिशा सालियान आणि SSR चे खरे आरोपी शोधायचं विसरून फालतू प्रकरणात गुंतले. अजूनही राज्य सरकार संशयास्पद पाठलाग करताना दिसतंय, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. 

हेही वाचा - संदीप सिंहसोबत भाजपचं कनेक्शन काय? काँग्रेसचा प्रश्न 

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. भाजपचा प्रत्येक मंत्री या प्रकरणावर बोलताना केवळ 'युवा मंत्री' इतकाच उल्लेख करत होता. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच शिवसेनेच्या काही नेत्यांनी आदित्य यांच्या नावाची वाच्यता करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. 

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण मंत्री आहेत. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख हे देखील तरुण मंत्री आहेत. मग त्यांच्यापैकी आदित्य ठाकरे यांनीच स्पष्टीकरण का दिलं? इतरांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही?, असा प्रश्नही नितेश राणे यांनी केला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं अशी मागणी करण्यासोबतच ठाकरे सरकारमधील एका युवा नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप सातत्याने भाजपकडून केला जात होता. खासकरून निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे अत्यंत आक्रमकपणे या प्रकरणावरून सरकारवर आरोप करत आहेत.  

हेही वाचा - शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा