Advertisement

शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

शिवसेनेच्या काही नेत्यांनी आदित्य यांच्या नावाची वाच्यता करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. भाजपचा प्रत्येक मंत्री या प्रकरणावर बोलताना केवळ 'युवा मंत्री' इतकाच उल्लेख करत होता. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच शिवसेनेच्या काही नेत्यांनी आदित्य यांच्या नावाची वाच्यता करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. (we never took a name of aaditya thackeray in sushant singh rajput suicide case says bjp mla nitesh rane)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, भाजपच्या कुठल्याही नेत्याने आदित्य ठाकरे यांचं थेट नाव घेतलेलं नाही. आम्ही केवळ सरकारमधील युवा मंत्री असाच उल्लेख केला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण मंत्री आहेत. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख हे देखील तरुण मंत्री आहेत. मग त्यांच्यापैकी आदित्य ठाकरे यांनीच स्पष्टीकरण का दिलं? इतरांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही?, असा प्रश्नही नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा - पुढचे काही दिवस सामनाच्या अग्रलेखाचे विषय ‘हे’ असतील- नितेश राणे

शिवसेनेतही जुने विरुद्ध नवे असे वाद आहेत. त्या वादातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढं आलं आहे. अनिल परब यांनीच ट्विट करून १३ तारखेला पार्टी झाल्याचं सांगितलं. त्यामुळे अनिल परब यांना काय माहिती आहे, त्याची चौकशी व्हायला हवी. विरोधकांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करावेत, असं आव्हान देऊन खासदार संजय राऊतच स्वत: आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवत आहेत,' असा आरोप राणेंनी केला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं अशी मागणी करण्यासोबतच ठाकरे सरकारमधील एका युवा नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप सातत्याने भाजपकडून केला जात होता. खासकरून निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे अत्यंत आक्रमकपणे या प्रकरणावरून सरकारवर आरोप करत आहेत. 

या आरोपांना उत्तर देताना अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये, हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलं होतं. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा