Advertisement

पुढचे काही दिवस सामनाच्या अग्रलेखाचे विषय ‘हे’ असतील- नितेश राणे

वाट लागल्यावरच शिवसेनेला मराठी माणूस आठवल्याची खाेचक टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

पुढचे काही दिवस सामनाच्या अग्रलेखाचे विषय ‘हे’ असतील- नितेश राणे
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरूवात झाली. त्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला. मात्र वाट लागल्यावरच शिवसेनेला मराठी माणूस आठवल्याची खाेचक टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे. (bjp mla nitesh rane criticised saamana editorial)

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखचे विषय: मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस. Night life करताना यांना मराठी माणूस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही.. तेव्हा Dino,Jacqueline,disha पाहिजे असतात.. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस ! असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून नितेश राणे यांच्याकडूनही सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर आरोप करण्यात येत आहे. याआधी अब बेबी पेंग्विन तो गया, इट्स शो टाईम असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेच्या युवा नेत्यावर निशाणा साधला होता.

हेही वाचा - पुरावे नष्ट करायला ‘त्यांना’ ६० दिवस मिळाले, निलेश राणेंचा पुन्हा आरोप

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये. सुशांत प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवाच. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा व त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचं राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावंच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखलं हे बरोबर नाही, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा - सरकारने आता आत्मचिंतन करावं, नारायण राणेंचा सल्ला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा