Advertisement

सरकारने आता आत्मचिंतन करावं, नारायण राणेंचा सल्ला

सुशांत सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतीयांच्या मनातील निर्णय आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा सल्ला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

सरकारने आता आत्मचिंतन करावं, नारायण राणेंचा सल्ला
SHARES

सुशांत सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतीयांच्या मनातील निर्णय आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा सल्ला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पाेलिसांकडून काढून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यावर नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. (mumbai police must investigate properly in sushant singh rajput suicide case says bjp mp narayan rane)

यावेळी नारायण राणे म्हणाले की, पोलिसांनी आपली शान, कायदा राखण्यासाठी योग्य तपास केला पाहिजे होता. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, ८ तारखेच्या पार्टीचाही तपास झालेला नाही. त्यामुळे हे घडणारच होतं. ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करत होतं, सगळ्या गोष्टी हाताळत होतं ते संशयास्पद होतं. आता काही केलं तरी पोलिसांच्या विरोधात गोळी सुटली आहे. एका व्यक्तीसाठी आपला वापर करु नका असं मला मुंबई पोलिसांना सांगायचं आहे, असं नारायण राणे म्हणाले.

ही वेळ का आली याचं महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण करावं. हे सरकार जनतेसाठी नाही, तर सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठीच सत्तेत आलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य आहे. आतातरी संजय राऊत यांनी आपलं तोंड बंद करावं, असं मला वाटतं असा टोलाही नारायण राणे यांनी राऊत यांना लगावला.

हेही वाचा - कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते? भाजपचा प्रश्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी दरम्यान दिला. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले. या  प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका रियानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं म्हटलं. मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारने त्यांना सहकार्य करावं. तसंच या प्रकरणाची केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासासाठी आम्हाला सहकार्य केलं गेलं नाही, आमच्या अधिकाऱ्याला कैद्याप्रमाणे वागवलं असल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता नि:पक्षपातीपणे तपास होईल, असं ते म्हणाले. 

हेही वाचा - राऊत म्हणतात, निकाल हाती आल्याशिवाय मत मांडणं योग्य नाही...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा