Advertisement

मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत, यावर मला बोलायचं नाही- देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर का दिसत नाहीत, यावर मी भाष्य करणार नाही. त्यांना जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील, तिथून घ्यावेव. पण निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत, यावर मला बोलायचं नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर का दिसत नाहीत, यावर मी भाष्य करणार नाही. त्यांना जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील, तिथून घ्यावेव. पण निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस कोल्हापूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाही, यावर मी भाष्य करणार नाही. त्यांना जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील, तिथून घ्यावे. पण निर्णय व्हावे. प्रशासकीय रचनेत दौर्‍याचे एक महत्त्व असतं. त्यातून कामाला गती मिळते. ते दौरे का करीत नाही, यावर मला बोलायचं नाही, टीकाही करायची नाही. 

प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालते, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असतं. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

हेही वाचा - दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

तसंच आपली लढाई ही मोदी सरकारशी नाही, हे त्यांना कुणीतरी लक्षात आणून द्यावं. आपल्याला कोरोनाशी लढायचं की घाबरायचं, हे त्यांना ठरवावं लागेल. केवळ स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचं काम सत्तेतील महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्या विरोधात लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. नाहीतर आपण रोज भेटून अशाच चर्चा करत राहू. मात्र आपल्याला लढायचं असेल तर ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे, असं रोकठोक मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडलं होतं. त्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला.

त्याचबरोबर दारूची दुकाने उघडण्याने काय होतं आणि मंदिरं खुली केल्याने काय होतं, हे सर्वांना कळतं. जो उत्साह दारूची दुकाने उघताना दाखविला, त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा, असं म्हणत राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा