कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर?

वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांची भाजपा प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोळंबकर यांनी आपल्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह फोटो असलेला एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये काँग्रेसचा कोणताही नेता दिसत नसल्यामुळं त्यांच्या भाजपाच्या प्रवेशांच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अद्याप राजीनामा नाही

कोळंबकर यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही. तसंच त्यांनी अधिकृतरित्या भाजपा प्रवेशाची घोषणाही केलेली नाही. यापूर्वी कोळंबकर यांनी स्वत: आपल्याला भाजपाकडून प्रस्ताव मिळाल्याची माहिती दिली होती. परंतु कोळंबकर यांनी अद्याप याबाबत अधिकृत भूमिका घेतली नाही.

शिवसेनेकडून श्रद्धा जाधव

याठिकाणी शिवसेनेकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून मुंबई महापालिकेच्या माजी महापौर डॉ. श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात युतीकडून कोण उतरणार हे पहावं लागणार आहे.

युती चिंतेचा विषय

कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे खांदे समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये भाजापाच्या मिहिर कोटेचा यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. कोळंबकर अवघ्या ८०० मतांनी विजयी झाले होते. गेल्या ३५ वर्षांपासून ते आमदार म्हणून कार्यरत असले तरी त्यांच्या मतांचं कमी होणारं मार्जिन तसंच शिवसेना भाजपा युती हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. 

मुख्यमंत्र्यांचं सहकार्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सहकार्य केलं असल्याचं कोळंबकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. तसंच जे जनतेच्या कार्यात सहकार्य करतात त्यांचेच फोटो आपण बॅनरवर लावत असल्याचंही ते म्हणाले.


हेही वाचा -

दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा राहुल शेवाळे यांना उमेदवारी

मतदानासाठी यंदा प्रथमच 'व्हीव्हीपॅट'चा वापर


पुढील बातमी
इतर बातम्या