दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा राहुल शेवाळे यांना उमेदवारी ?

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मातोश्रीवर राहुल शेवाळे यांच्या डिजिटल कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या कामाचे कौतुक करत आपण लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले.

SHARE

राज्यात शिवसेना आणि भाजपाच्या यूतीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबईतील जागेच्या प्रतिक्षेत होते. परंतु, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबई या जागेसाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचीच निवड करण्याचे संकेत दिले आहेत.


लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मातोश्रीवर राहुल शेवाळे यांच्या डिजिटल कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांच्या कामाचे कौतुक करत आपण लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. तसंच, दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा उमेदवारी देण्याबाबतचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


इशान्य मुंबई मतदार संघाची मागणी

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा हव्या आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर रामदास आठवले यांनी 'इशान्य मुंबई मतदार संघा'ची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता 'इशान्य मुंबई मतदार संघ' आठवले यांनी मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

'असं' होणार महाराष्ट्रात मतदान

मतदानासाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर



संबंधित विषय
ताज्या बातम्या