म्हणूनच फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबलं...

सध्या अन्वय नाईक प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना चांगलीच धार चढली आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपीचा भाजपाशी थेट संबंध असल्यानेच फडणवीस सरकारने आत्महत्येची चौकशी दाबली, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत म्हणाले की, दिवंगत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या आरोपीला वाचवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक हयात असताना त्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली आणि भाजपाची हीन मानसिकता दर्शवली आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा आणि जमीन व्यवहाराचा कुठलाही संबंध नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. 

हेही वाचा - ठाकरे कुटुंबीयांसोबत केलेल्या जमीन व्यवहारात गुपित काय?

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली, या आत्महत्येमागचं कारण त्यांच्या पत्नी आणि कुटुंबिय शोधत आहेत. न्याय मागत आहेत, यात त्यांची काय चुकी? त्यांचा अपराध हाच आहे का ते भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीविरोधात न्याय मागत आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि अँकर हे भाजपचा अजेंडा चालवतात. त्यासाठीच या चॅनलला केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्याने फंडींग केलं जातं. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. 

भाजपची थेट संबंध असल्यानेच फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबलं, या प्रकरणाची चौकशी होऊ दिली नाही. यामुळे नाईक कुटुंबियांना २ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत वणवण फिरावं लागलं. आता जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली, हे भाजपला खटकू लागलं आहे. त्यातूनच अन्वय नाईक कुटुंबाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचं सोमय्या यांना काहीही पडलेलं नाही. कारण भाजपा हा पक्ष महाराष्ट्रद्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

(congress spokesperson sachin sawant slams kirit somaiya over arnab goswami link with bjp)

हेही वाचा - कितीही फडफड केली तरी.., संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या