Advertisement

कितीही फडफड केली तरी.., संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार ५ वर्षे चालणार, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे.

कितीही फडफड केली तरी.., संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा
SHARES

मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? कायद्याच्या चौकटीत राहून केलेला व्यवहार हे लोक भ्रष्टाचार म्हणून ओरडत आहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. हा त्यांना इशारा आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार ५ वर्षे चालणार, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत त्यांचे नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी देखील केली होती. 

हेही वाचा - ठाकरे कुटुंबीयांसोबत केलेल्या जमीन व्यवहारात गुपित काय?

त्यावर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना चांगलंच फैलावर घेतलं. ते म्हणाले, अन्वय नाईक यांच्याशी २१  व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून  भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!

आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. पण, शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे म्हणून अशी फडफड करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून केलेला व्यवहार भ्रष्टाचार म्हणून ओरडत आहेत. ते रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वत:चा चेहरा पाहतात आणि स्वत: ची प्रतिमा पाहून भ्रष्टाचार झाल्याचं त्यांना वाटतं

एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? ती महिला तुमची कोणी लागत नाही? तिचा नवरा मेला आहे, सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

(shiv sena mp sanjay raut slams kirit somaiya over land scam allegation)

हेही वाचा - शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी ३५४ कोटी रुपये बिल्डरला गिफ्ट दिले


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा