Advertisement

ठाकरे कुटुंबीयांसोबत केलेल्या जमीन व्यवहारात गुपित काय?

किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत. आमच्या व्यवहाराचा आणि आत्महत्येच्या प्रकरणा काय संबंध आहे. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका, असा खुलासा नाईक कुटुंबाने केला.

ठाकरे कुटुंबीयांसोबत केलेल्या जमीन व्यवहारात गुपित काय?
SHARES

ठाकरे कुटुंबियांनी आमच्याकडून जागा विकत घेतली यात गुपित काहीच नाही. भाजप नेते किरीट सोमय्या दाखवत असलेले सातबाराचे उतारे महाभूमीच्या वेबसाईटवर गेल्यावर कुणालाही मिळतात. त्यामुळे अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, अशा शब्दांत अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांचं खंडन केलं. 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत त्यांचे नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी देखील केली होती. 

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा प्रश्न

त्यावर नाईक कुटुंबाकडून खुलासा करण्यात आला. आमच्यातील जमीन व्यवहाराच्या आरोपांबद्दल मला बऱ्याच लोकांकडून कळलं. ठाकरे कुटुंबाने आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. योग्य मार्गाने झालेला हा व्यवहार आहे. कुणी कुणाला जमीन विकत देऊ शकत नाही का? यामध्ये किरीट सोमय्यांना आता समस्या का जाणवत आहे. किरीट सोमय्यांना नेमकं काय दाखवून द्यायचं आहे, असे प्रश्न विचारत सोमय्यांना काहीही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, असं आज्ञा नाईक यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत. आमच्या व्यवहाराचा आणि आत्महत्येच्या प्रकरणा काय संबंध आहे. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्या यांना दिला.

तर अन्वय नाईक यांना जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? असा सवाल अक्षता नाईक यांनी उपस्थित केला. 

(anvay naik family answers allegations over land scam from kirit somaiya )

हेही वाचा- रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा