Advertisement

उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा प्रश्न

ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा प्रश्न विचारत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी या व्यवहाराची माहिती राज्यातील जनतेला द्यावी, असं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा प्रश्न
SHARES

ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा प्रश्न विचारत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी या व्यवहाराची माहिती राज्यातील जनतेला द्यावी, असं आवाहन केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबाच्या जमीन खरेदी व्यवहारावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, दिवंगत इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा नाईक आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाले आहेत. यापैकी २१ सातबारा उतारे आम्ही आतापर्यंत शोधून काढले आहेत. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी एकत्रितपणे जमिनीचे आर्थिक व्यवहार केले आहेत. ही दोन कुटुंब एकत्र येण्याचा नेमका उद्देश काय?

जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅकचं-व्हाईट होत असतं. लोकांना तसं वाटतं. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला या जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी,  उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे असे किती व्यवहार झाले आहेत? उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं, असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं.

हेही वाचा- किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना आहे. तेव्हा फडणवीस सरकारकडे या व्यवहाराच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी किरीट सोमय्या यांना विचारला. त्यावर स्थानिक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासरवाडी रेवदंड्यात आहे, तिथून थोड्याच अंतरावर ही जमीन असल्याने मला या व्यवहाराची माहिती मिळाली.

 याबाबत संबंधित तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यावर आरटीआय करा माहिती मिळेल, असं उत्तर ते देतात. तर अन्वय नाईक प्रकरणाचा फेरतपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी विचारल्यावर संबंधित आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं, असं उत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं.

(bjp leader kirit somaiya alleges on maharashtra cm uddhav thackeray over land purchase from anvay naik)

हेही वाचा- रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा