Advertisement

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपरमधील एका महिलेचा काही दिवसांपूर्वी नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु त्यांचा मृतदेह हाजीअली इथं सापडल्याने या मृत्यूमागील गूढ वाढलं आहे.

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात
SHARES

घाटकोपरमधील एका महिलेचा काही दिवसांपूर्वी नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु त्यांचा मृतदेह हाजीअली इथं सापडल्याने या मृत्यूमागील गूढ वाढलं आहे. पोलिसांनी तपास करून या महिलेच्या मृत्यूची उकल करावी, या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना गुरूवारी दुपारी ताब्यात घेतलं. (bjp leader kirit somaiya detained by mumbai police at ghatkopar)

घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल दामा (३२) ३ आॅक्टोबर २०२० रोजी गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण तासभर उलटूनही त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी पीठ आणण्यासाठी नेलेली पिशवी एका नाल्याजवळ आढळून आली. या नाल्यावरील काँक्रीटचं झाकण उचकलेलं होतं. शीतल घराबाहेर पडल्या तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्याने, त्या नाल्यात पडल्या असाव्यात, असा अंदाज लावत त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. 

हेही वाचा - नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही - महापालिका

पोलिसांनीही या तक्रारीनंतर घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, वांद्रे, माहीम इ. परिसरातील सर्व नाल्यांची तपासणी केली. परंतु त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. परंतु त्या बेपत्ता होण्याच्या ३३ तासांनंतर त्यांचा मृतदेह २२ किमी लांब हाजी अली येथील समुद्रात आढळून आला.

पालिका अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार असल्फा येथील छोट्या नाल्यात पडल्यानंतर मृतदेह वरळी-हाजीअलीपर्यंत वाहून येऊच शकत नाही. कारण अशी थेट नाल्याची व्यवस्थाच परिसरात नाही. पाणी उपसा होण्यासाठी तीन ते चार चाॅको पाॅईंट्स आहेत, तिथं मृतदेह नक्कीच अडकायला हवा, परंतु तसंही झालेलं नाही. किंवा माहीम मिठी नदीतही वाहून आलेला नाही. शिवाय त्यांना नाल्यात पडतानाही कुणी बघितलेलं नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

तर, पोलिसांनी या प्रकरणी १२ दिवसानंतरही एफआयआर नोंदवलेला नाही. शितल दामा यांच्या परिवाराला न्याय हवा. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. या दरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा