Advertisement

नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

शीतल दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्या दुसऱ्या मार्गावरुन जात होत्या.

नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला
SHARES

घाटकोपरमधील असल्फा येथून उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला आहे. शीतल भानुशाली असं या महिलेचं नाव आहे.  दोन दिवसांपूर्वी मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. या पाण्यातून जात असताना मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या होत्या.

 शीतल दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्या दुसऱ्या मार्गावरुन जात होत्या. यावेळी उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. असल्फा मेट्रो खाली आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गटारात रविवारी शोधकार्य सुरू होते. मात्र, मुंबई महानगर पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस यांना त्यात यश मिळालं नाही. रविवारी रात्री हाजीअली येथील समुद किनारी त्यांचा मृतदेह आढळला.

गटारातून वाहून जाऊन अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. गटारावर बसवलेली झाकणे ही पाण्याच्या जोराने उघडतात. तसंच मॅनहोल उघडे ठेवून साचलेल्या पाण्याला वाट करुन दिली जाते. मात्र या उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या तुफान पावसात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनारी सापडला होता. 


हेही वाचा

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात

रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा