कमळाचार्याचा तिरका डोळा जनतेनेच फोडावा- काँग्रेस

मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सध्या भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. कांजूरमार्गची जागा केंद्राच्या मालकीची असून सरकारचा निर्णय चुकल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना उत्तर देताना भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

भाजपच्या आरोपांना उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. मविआ सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांत भाजपा व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्य सरकारची आहे. (congress spokesperson sachin sawant slams bjp over metro car shed and kanjurmarg land)

हेही वाचा- विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती

सन १९८१ च्या आधीपासून महाराष्ट्र शासनाचं नाव या जमिनीवर लागलेलं आहे. २०१५ साली विभागीय आयुक्तांनी सॉल्ट डिपार्टमेंटला ही जमीन दिल्याचे कोणतेही पुरावे देता न आल्याने त्यांचा दावा निकालात काढला होता. एवढंच नाही, तर तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. असं असताना ३ वर्षे या निर्णयाला सॉल्ट डिपार्टमेंटने न्यायालयात आव्हान दिलं नाही. पण तीन वर्षांनंतर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर लगेच त्यांना आठवण झाली. हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे, यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे.

हेही वाचा- भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचाय- नवाब मलिक
पुढील बातमी
इतर बातम्या