Advertisement

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती आहे, अशी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलारयांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती
SHARES

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ही तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती आहे. मेट्रो कारशेडच्या बाबतीत देखील असंच चाललं आहे, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मेट्रो कारशेडवरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी आम्ही म्हटलं होतं की राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसून येतोय. ज्यावेळी यासंबंधीची घोषणा झाली त्याचवेळेला प्रतिक्रिया देताना आम्ही म्हटलं होतं, अहंकारी राजा आणि विलासी राजपूत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येताहेत त्यावरून तरी हेच दिसतंय. कारशेड कांजूरमार्गला हलवण्याआधी मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न देखील आम्ही उपस्थित केला होता. केंद्राच्या पत्राने गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या दुष्परिणामांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. 

हेही वाचा- मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क

मेट्रोच्या प्रकल्पामध्ये तर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची (thackeray government) कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा प्रकल्पाला रेंगाळत ठेवायचं, कायदेशीर प्रक्रियेत अडकवणे आणि मग जनतेला भटकणे, चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमीत करणे हा सगळा प्रकार सुरू आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला.

दरम्यान, कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं (metro car shed) काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा विकोपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आरोपांना पुन्हा धार आली आहे.

(bjp mla ashish shelar slams thackeray government over metro car shed in kanjurmarg)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा