हा देश ड्रामा करणाऱ्यांचाच, जितेंद्र आव्हाडांचा सीतारमण यांना टोला

जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ड्रामेबाजी आहे, तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (maharashtra housing minister jitendra awhad) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister nirmala sitharaman) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या मजुरांची भेट घेणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सीतारमण यांनी ड्रामेबाज असं म्हटलं होतं.

माणुसकी व्यक्त होते

त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणं, गप्पा मारणं ,त्यांच्या बरोबर चालणं.. राहुल गांधींची ड्रामेबाजी आहे, असं निर्मलाअक्कांचं म्हणणं आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ड्रामेबाजी आहे तर, मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथं व्यक्त होतेच. 

हेही वाचा - कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण

मजुरांशी संवाद

लाॅकडाऊनमुळे (lockdown) देशातील इतर राज्यांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या मूळ गावी निघाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (congress leader rahul gandhi) यांनी शनिवारी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी (migrant worker) संवाद साधला. तसंच विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेल्या मजुरांजवळ जाऊन बसले. या संवादा दरमयान मजुरांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या.

काय म्हणाल्या सीतारमण?

त्यावर आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना निर्मला सीतारमण यांनी काँग्रेस आम्हाला ड्रामेबाज म्हणते तर कालचा प्रकार काय होता? राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला पाहिजे होतं. त्यांच्याशी जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं. हा निव्वळ त्यांचा नाटकीपणा होता, असं सीतारमण म्हणाल्या.

हेही वाचा - मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड

पुढील बातमी
इतर बातम्या