मनसेच्या एकमेव आमदाराचं लाखमोलाचं काम, कोरोनासाठी दिलं अख्खं रुग्णालय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी कोरोनाग्रस्तांवर (corona patient) उपचार करण्यासाठी स्वत:च्या मालकीचं संपूर्ण रुग्णालय प्रशासनाला उपलब्ध करून दिलं आहे. पाटील यांच्या या औदार्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वत: ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यांत ते म्हणतात की, कल्याण- डोंबिवली महापालिका (kdmc area) परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर कोरोनासाठी वाहिलेला डोंबिवलीतील एखादा खाजगी दवाखाना उपलब्ध करून देण्यासाठी सूचना महापालिका आयुक्तांना केली होती.आवश्यकता वाटल्यास आमचे RR हाॅस्पीटल (private hospital) तात्पुरतं ताब्यात देण्याची तयारी देखील दाखवली होती. ही मागणी मान्य झाली. या रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डाॅक्टारांची मदत घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जातील . 

हेही वाचा - कोरोना लढ्यासाठी काँग्रेसची १८ सदस्यांची टास्कफोर्स

सध्या कल्याण-डोंबिवली परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ एवढी झाली असून २ कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे पाहून प्रशासनाने केडीएमसीकडे अधिक लक्ष देण्याची मागणी राजू पाटील सातत्याने करत आहेत. 

कल्याण-डोंबिवलीकोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. इथं टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट आणि ट्रॅकिंग हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीय. कोरोनाबाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत आहे. धारावीची केली तशी केडीएमसीची पाहणी करणं गरजेचं आहे, अशी विनंती राजू पाटील यांनी केली होती. 

तर त्याआधी कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.  त्यामुळे एकंदरीत केडिएमसी व परिसरातील लोकसंख्या पाहता इथंही कोरोना टेस्टींग लॅब असणं आवश्यक आहे, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती.

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त २ हजारांच्या पलिकडे, मृत्यूदर ८ टक्क्यांवर

पुढील बातमी
इतर बातम्या