Advertisement

कोरोना लढ्यासाठी काँग्रेसची १८ सदस्यांची टास्कफोर्स

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्कफोर्सची घोषणा केली आहे.

कोरोना लढ्यासाठी काँग्रेसची १८ सदस्यांची टास्कफोर्स
SHARES

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्कफोर्सची घोषणा केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या टास्कफोर्सची स्थापना केली आहे. ही समिती कोरानाविषय उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या समितीसोबत ४ उपसमित्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.  

कुणाचा समावेश ?

या टास्कफोर्समध्ये पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष असतील, तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक असतील. त्याशिवाय खा. राजीव सातव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुजफ्फर  हुसेन, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार संग्राम थोपटे, रणजित कांबळे, माजी आमदार कल्याणराव काळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. अमोल देशमुख यांचा या टास्कफोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमातून ही समिती कार्यरत राहणार आहे.

हेही वाचा- मुंबईतील बंद १५ रुग्णालये आठवडाभरात सुरू

उप समित्या

सामाजिक-आर्थिक परिणाम, आरोग्य, सरकारी उपायोजनांचा आढावा, मीडिया, सोशल मीडिया, हेल्पलाइन अशा ४ उपसमित्याही या मुख्य टास्कफोर्सच्या बरोबरीने काम करतील.

कामे काय? 

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाॅकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेची विविध प्रकारे मदत करण्यात येत आहे. ही मदत प्रक्रिया अधिक गतीमान करणे, कोरोना आटोक्यात येण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करणे, कोरोनाच्या संदर्भातील सरकारच्या उपाययोजना आणि सद्यस्थितीची माहिती घेऊन त्याचा साप्ताहिक अहवाल सादर करणे. इ. कामे ही समिती करणार आहे. 

हेही वाचा- Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा