Advertisement

मुंबईतील बंद १५ रुग्णालये आठवडाभरात सुरू

कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईतील १५ रुग्णालये मुंबई महापालिकेने बंद केली आहेत.

मुंबईतील बंद १५ रुग्णालये आठवडाभरात सुरू
SHARES

कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईतील १५ रुग्णालये मुंबई महापालिकेने बंद केली आहेत. ही रुग्णालये आता आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहेत. ही रुग्णालये पुन्हा खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या रुग्णालयांच्या तपासण्या पालिकेकडून या आठवडय़ात करण्यात येणार आहेत. 

 १५ रुग्णालयांतील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वोक्हार्ट रुग्णालयातील रुग्णाच्या संपर्कात आल्याने ५२ परिचारिकांसह डॉक्टरांना तर जसलोकमध्ये २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. भाटिया रुग्णालयात चार परिचारिकांनाही कोरोना झाला आहे.  हिंदुजा, ब्रीचकॅण्डी, दादरचे शुश्रूषा रुग्णालय, भायखळ्याचे जगजीवन रामनारायण रेल्वे रुग्णालय, पार्थ नर्सिग होम्स, चेंबूरमधील साई, मुलुंडचे स्पंदन, जोगेश्वरी येथील मिल्लत नगर अशा १५ रुग्णालयांमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याने ही रुग्णालये बंद करण्यात आली. येथील सेवा बंद झाल्याने आरोग्यसेवेवरील ताण अधिकच वाढला आहे.

या रुग्णालयांना निजर्तुंकीकरण करण्याची नियमावली दिली आहे. या आठवडय़ात रुग्णालयातील काही नमुने तपासणीसाठी पाठवून विषाणू संसर्ग नष्ट झाल्याची पडताळणी केली जाईल. रुग्णालयातील मशीनसुद्धा निर्जंतुकीकरण केलं जाईल. मग पालिकेची डॉक्टरांची टीम पाहणी करेल. त्यानंतर पुन्हा ही रुग्णालये लवकरच पुन्हा खुली केली जाणार आहेत असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.



हेही वाचा -

जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त

मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा