Advertisement

Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त २ हजारांच्या पलिकडे, मृत्यूदर ८ टक्क्यांवर

राज्यात आणखी ८२ नवीन कोरोनाबाधित (corona patient) रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आता २ हजारांच्या पलिकडे गेली आहे.

Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त २ हजारांच्या पलिकडे, मृत्यूदर ८ टक्क्यांवर
SHARES

राज्यात आणखी ८२ नवीन कोरोनाबाधित (corona patient) रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आता २ हजारांच्या पलिकडे गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील (maharashtra) कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून  २०६४ वर जाऊन पोहोचली आहे. 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिनुसार, राज्यात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधित ८२ रुग्णांपैकी ५९ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. तर ठाण्यात ५, वसई-विरारमध्ये १, पालघर २, पुणे ३ आणि मालेगावमध्ये १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना रुग्णांची (COVID-19 patients) संख्या वाढून ९१५२ एवढी झाली आहे. तर ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

हेही वाचा- आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज!

एका बाजूला देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ३ टक्के असला, तर महाराष्ट्रात हाच दर ८ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत १६०० हून अधिक कोरोना रुग्ण झाले आहेत. मुंबईत ६० हून अधिक जणांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येकडे पाहता महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केली होती. शिवाय कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार उपायोजना करण्यासाठी राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आहेत. 

मुंबईत (mumbai slum) दाटीवाटीच्या लोकवस्तीत प्रामुख्याने कोरोनाग्रस्त आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाग्रस्तांना शोधून काढण्यासाठी घरोघरी जाऊन नमुने घेतले जात आहे. जिल्हानिहाय चाचणी केंद्र सुरू करून कोरोनाग्रस्तांवर त्वरीत उपाययोजना करण्याचा प्रयत्नही राज्य सरकारकडून केला जात आहे.

हेही वाचा- Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा