Advertisement

आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज!

आतापर्यंत राज्यातील २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, तर १६१६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज!
SHARES

आतापर्यंत राज्यातील २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, तर १६१६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सद्यस्थिती काय?

आजपर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

तबलिगींचा शोध सुरूच

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर  शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशिम मधील आहेत.  याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा