लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलंय, राजू पाटील यांची टीका

राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सोमवार ८ जूनपासून लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत. ही शिथिलता मिळताच मुंबईतील रस्त्यांवर गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. रस्त्यावर वाहतूककोंडी, तर चौपाट्यांवर घोळक्याने बसलेल्या लोकांकडे पाहून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (coronavirus live updates mns mla raju patil raised questions over maharashtra government mission begin again and lock down exit plan) यांनी सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडून दिल्याची टीका केली आहे.

राज्य सरकारने सोमवारपासून खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी दिली. या कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यालयात येण-जाणं सोपं व्हावं म्हणून मार्गदर्शक नियमावलीत दुरूस्ती करून मुंबई महानगर (MMR) परिसरात प्रवासालाही मुभा दिली. बेस्टनेही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू केली. यामुळे पहिल्याच दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूककोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा - रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, संसर्गाचा धोका

लोकल ट्रेन बंद असल्याने तसंच सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरु नसल्याने लोकं खासगी वाहनाने प्रवास करू लागले आहेत. परिणामी सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूकोंडी झाली होती. लॉकडानमुळे निर्मनुष्य झालेली ठिकाणं, रस्त्यांवर पुन्हा पूर्वीप्रमाणे गर्दी दिसू लागली आहे. एवढंच काय तर काही लोकांनी कोरोनाचं संकट टळल्याच्या अविर्भावात मरिन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू, दादर, इ. चौपाट्यांवरही गर्दी केली. यापैकी कुठल्याही ठिकाणी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

यावर भाष्य करताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी, "तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलंच नियोजन व धोरण दिसत नाही, अशा शब्दांत सरकारवर टीका केली आहे. 

हेही वाचा - लाॅकडाऊनमध्ये शिथीलता देताच मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी

पुढील बातमी
इतर बातम्या