‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी

लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्यासह राज्याबाहेर अडकलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत.

केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांत ठिकठिकाणी अडकून पडलेले लाखो स्थलांतरीत मजूर (migrant workers), विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू यांना आपापल्या घरी जाण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी घेतला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने (home ministery) यासंबंधीचा आदेश काढत स्थलांतरींताच्या प्रवासाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर टाकली आहे. अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. स्थलांतरीतांना प्रवासाची परवानगी देण्याआधी त्यांची कोरोनासंदर्भातील (coronavirus) तपासणी केली जाईल. कोरोनाची लक्षणं नसतील, तरच त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येईल, अन्यथा नाही, असंही या निर्देशांत स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट झालीच पाहिजे- उद्धव ठाकरे

कुठलीही लक्षणे नसावीत

त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्याबाहेर जाणाऱ्या किंवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तींमध्ये कोरोनासंदर्भातील काहीही लक्षणे आढळल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलंही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक असेल.

प्रवाशांची संपूर्ण यादी

ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणं आवश्यक असेल.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास, त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणं गरजेचं. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक. पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत, तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार.

हेही वाचा - केंद्राचा मोठा निर्णय, देशभरात अडकलेल्या परप्रांतीयांच्या प्रवासाला अखेर मंजुरी

सर्वात आधी क्वारंटाईन

राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होणार. त्यानंतर संबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांना केंद्र शासनाचे आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याशी कायम संपर्क ठेवता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या