Advertisement

केंद्राचा मोठा निर्णय, देशभरात अडकलेल्या परप्रांतीयांच्या प्रवासाला अखेर मंजुरी

महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांत ठिकठिकाणी अडकून पडलेले लाखो स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू यांना आपापल्या घरी जाण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी घेतला आहे.

केंद्राचा मोठा निर्णय, देशभरात अडकलेल्या परप्रांतीयांच्या प्रवासाला अखेर मंजुरी
SHARES

महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांत ठिकठिकाणी अडकून पडलेले लाखो स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू यांना आपापल्या घरी जाण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी घेतला आहे. लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लाखो स्थलांतरीतांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

जबाबदारी राज्यांवर

केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश काढत स्थलांतरींताच्या प्रवासाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर टाकली आहे. अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. स्थलांतरीतांना प्रवासाची परवानगी देण्याआधी त्यांची कोरोनासंदर्भातील तपासणी केली जाईल. कोरोनाची लक्षणं नसतील, तरच त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येईल, अन्यथा नाही.

रेल्वे सुरू करण्याची मागणी

तब्बल महिन्याभरापासून अडकलेले परप्रांतीय लोकं आपल्या मूळ गावी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. महाराष्ट्रात साडेसहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे. या परप्रांतीयांना गावी पाठवण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची विनंतीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली होती. त्यातच राजस्थानातील कोटा इथं अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रत्येक राज्याने बस पाठवल्या होत्या. 

काय आहेत निर्देश ?

लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोकं देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. त्यांना काही नियमांतर्गंत आपल्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात येत आहे.

  • सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असून अडकलेल्या स्थलांतरीतांना त्यांच्या राज्यात परत पाठवताना किंवा आपल्या राज्यात प्रवेश देताना कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणं गरजेचं आहे.
  • एखाद्या समुहाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल, तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यासाठी आधी संमती देणं गरजेचं आहे.
  • प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्क्रिनिंग करण्यात यावं. ज्या स्थलांतरीतांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नसतील, केवळ त्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात यावी.
  • प्रवासासाठी बसचा वापर करण्यात यावा. प्रवासाआधी या बसचं निर्जुंतीकरण करणं तसंच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.
  • इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित लोकांची तपासणी करावी. तसंच त्यांना होम क्वारंटाइन करण्यात यावं. गरज असली तर संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या सगळ्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नजर ठेवण्याची व्यवस्था करावी.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा