Advertisement

प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट झालीच पाहिजे- उद्धव ठाकरे

एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट झालीच पाहिजे- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना व्हायरस (coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी (coronavirus test) करून त्यांना उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार गुरूवार ३० एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

त्यानुसार मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची (corona positive patient) संख्या पाहाता या  रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये तसंच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजाराच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता (principal seceratory) यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत. 

काय आहे आदेशात?

कुठल्याची आजाराचा रुग्ण रुग्णालायत आल्यावर त्याची तातडीने अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तिथं रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी करण्यात यावी. रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणं, दाखल करून घेणं आणि घरी सोडणं याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! प्लाझ्मा थेरपी झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू?

खाटांचं नियोजन

मुंबई असलेल्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळखक्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात यावा. विशिष्ट ओळख क्रमांक असल्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेण्यात येऊ नये. या कार्यपद्धतीमुळे कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची निश्चित माहिती मिळू शकेल.

कोरोना संशयितांना प्राधान्य

कोरोना संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन दाखल करावं. त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल, अशी व्यवस्था करावी. रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये हलविण्यात यावं.

१२ तासांच्या आत अंत्यसंस्कार

एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत त्याचा मृतदेह वॉर्डमधून हलविण्याबाबत कार्यवाही करावी. ठरविलेल्या कार्यपद्धतीनुसार १२ तासाच्या आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत.

हेही वाचा - केंद्राचा मोठा निर्णय, देशभरात अडकलेल्या परप्रांतीयांच्या प्रवासाला अखेर मंजुरी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा