Advertisement

दुर्दैवी! प्लाझ्मा थेरपी झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू?

मुंबईतील वांद्रे येथील लिलावली रुग्णालयात एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा (plasma therapy) प्रयोग करण्यात आला होता. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

दुर्दैवी! प्लाझ्मा थेरपी झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू?
SHARES

मुंबईतील वांद्रे येथील लिलावली रुग्णालयात एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा (plasma therapy) प्रयोग करण्यात आला होता. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती दिली होती. 

या व्यक्तीला २० एप्रिल रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्गाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला व्हेंटिलेटर्सवर ठेवण्यात आलं. या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयाने महापालिकेकडे प्लाझ्मा थेरपीची परवानगी मागितली होती.

हेही वाचा- Coronavirus Update: गुड न्यूज! मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी- राजेश टोपे

तबलिगीचं रक्त

या परवानगीनंतर मुंबईतील कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या एका तबलिगी जमातीच्या (tablighi jamaat) सदस्याने लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) जाऊन त्याचा प्लाझ्मा दिला होता. दिल्लीच्या मरकजमध्ये (markaz) गेलेल्या तबलिगीच्या या सदस्याला कोरोना (covid-19) झाला होता. त्यानंतर उपचारांना चांगला प्रतिसाद देत या व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. 

इतरही प्रयोग

या व्यक्तीचा प्लाझ्मा घेऊन तो लिलावती रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णाला देण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने प्लाझ्मा थेरपीचा दुसरा प्रयोग मुंबईच्याच नायर रुग्णालयात करण्यात येईल. त्यानंतर पुण्यासह इतर ठिकाणीही केंद्राच्या गाइडलाइननुसारच ही थेरपी केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली होती. परंतु दुर्दैवाने या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

काय आहे प्लाझ्माा थेरपी?

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ८०० मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा