देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला देणार ‘बुस्टर डोस’

(File Image)
(File Image)

मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची मुंबईत अतिविराट सभा पार पडणार आहे. भाजपने या सभेला बुस्टर डोस सभा असं नाव दिलं आहे. या सभेतून शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात येणार आहे. या सभेतून भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यात येणार आहे.

तर विरोधकांना डोस देण्यात येणार असल्याचं भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सभेची माहिती दिली. महाराष्ट्रात दिनानिमित्त एक रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे.

येत्या १ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुंबईतील बुथ प्रमुख, हजारो कार्यकर्ते मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर उत्साहात आणि आनंदात येणार आहेत. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे.

या सभेतून कार्यकर्त्यांना बुस्टर आणि शिवसेनेसहीत महाविकास आघाडीला कडकडीत डोस देण्यात येणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसात काळोखात मेट्रोच्या कारशेडच्या पत्र्याच्या मागे लपून एक दोन लोकं एकत्रं येऊन दगड मारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या पोलखोल सभेला घाबरून हे कृत्य केलं जात आहे. शिवसेनेचे कर्मकांड आम्ही जनतेसमोर आणले. काही लोक १४ मे रोजी सभा घेणार आहेत. कोणी ३० मे रोजी सभा घेणार आहेत. तर कोणी १ मे रोजीच सभा घेत आहे. मात्र, भाजपची १ मे रोजीची पोलखोल सभा सर्वात मोठी असणार आहे. या सभेतून देवेंद्र फडणवीस विरोधकांना डोस देतील. तसेच शिवसेनेची आम्ही पूर्णपणे पोलखोल करू, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील येत्या १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. राज यांनी भोंग्यांचा विषय हातात घेतल्याने ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ : राज ठाकरे

पुन्हा निर्बंध नको असतील तर स्वत:हून मास्क घाला - उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या