Advertisement

पुन्हा निर्बंध नको असतील तर स्वत:हून मास्क घाला - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राला पत्र पाठवणार आहेत.

पुन्हा निर्बंध नको असतील तर स्वत:हून मास्क घाला - उद्धव ठाकरे
SHARES

गेल्या महिन्याच्या तुलनेत राज्यात कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या वाढत असून चौथी (forth wave) लाट येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही सूचना दिल्या आहेत.

कोरोनाची (Corona) चौथी लाट थांबवायची असेल आणि राज्यात आणखी कोणतेही निर्बंध लादायचे नसतील तर नागरिकांनी मास्क घालणं आणि लसीकरण करणं बंधनकारक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील रुग्णांमध्ये फ्लूसदृश लक्षणं आढळल्यास तातडीनं आरटीपीसीआर चाचणी करण्याचे, राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवणे आणि लसीकरणाला गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लसीकरण अनिवार्य करा, केंद्र सरकारकडे मागणी

लसीकरण (vaccine) अनिवार्य करण्यासाठी आणि लसीचे दोन डोस मिळालेल्यांना बूस्टर डोस देऊन ९ महिन्यांचा कालावधी कमी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याबाबत प्रत्येक जिल्हा आणि राज्य स्तरावर आवश्यक जनजागृती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना सरकारी रुग्णालयातून प्रतिबंधात्मक डोस देण्याचा सरकार विचार करत आहे.

"कोरोना अजून संपला नाही"

कोरोना अजून संपलेला नाही, जगभर नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व महसूल, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी हेच खरे योद्धे आणि राज्याच्या विकासाचा कणा आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील आणि केवळ धोरणात्मक बाबी मंत्रालयाच्या अखत्यारित येतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी कार्यालयाला दिले.



हेही वाचा

औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक, मुख्यमंत्र्यांची नाराजी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा