बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रमाकडून करण्यात येणाऱ्या वीज दरवाढीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी याप्रकरणी विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत ही दरवाढ रोखण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा- मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा? राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं
विद्युत नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय वीज वितरण कंपन्यांना वीजदरवाढ करता येत नाही. त्यानुसार मुंबईत वीजदरवाढ करता येईल का? अशी विचारणा करणारं पत्र बेस्ट प्रशासनाने (best) आयोगाला पाठवल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप वीजदरवाढीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी ही माहिती मिळताच मनसेने (mns) याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. वीजदरवाढ करून मुंबईकरांवर आणखी बोजा टाकला जाऊ नये, असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे.
सोबतच बेस्टच्या परिवहन (best) विभागाला होणार तोटा भरून काढण्यासाठी विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील मनसेकडून करण्यात आला आहे. बेस्टच्या विद्युत विभागाचं काम चांगलं असल्याने विद्युत विभाग कायम नफ्यात असतो. या तुलनेत परिवहन विभाग कायम तोट्यात राहतो. अशा स्थितीत एका विभागाचा नफा दुसऱ्या विभागाकडे वळवून त्या विभागाला आर्थिक संकटात टाकू नये, अशी मागणी राज ठाकरे (raj thackeray) यांनी दिलेल्या पत्रातून करण्यात आली आहे.
हेही वाचा- तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा
परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या (bombay high court) आदेशानुसार विद्युत विभागाचा नफा अशा बेस्टच्या परिवहन विभागाला देता येत नाहीत. त्यामुळे नफा वळवण्याच्या चर्चांना आधार नसल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.