राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावधगिरीचा उपाय म्हणून आपापली कोरोना चाचणी करुन घेण्याच आवाहनही त्यांनी केलं आहे. लक्षणे नसल्यामुळे ते घरी क्वारंटाईन झाले आहेत.
नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटल की, माझी कोविड चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.
याआधी महाविकास आघाडीतील अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली.