शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा कोरोना अहवाल १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करून ते रुग्णालयातून घरी गेले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व नागपूरात झालं. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या.
ते १९८५ ते ८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. लातूरचा एक शक्तिशाली सहकारी नेता अशी त्यांची ओळख होती.
हेही वाचा