फडणवीस आता ‘या’ बंगल्यात राहणार

मी पुन्हा येणार, असं म्हणणारे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अखेर वर्षा बंगल्यातून काढता पाय घ्यावा लागला आहे. हा बंगला नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आल्याचं पत्रक सोमवारी सामान्य प्रशासन विभागाने काढलं. तर नव्या बंगल्याच्या शोधात असणारे फडणवीस यांच्या निवासस्थानाची सोय देखील करण्यात आली आहे. 

सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी पत्रक काढत नव्या बंगल्यांचं वाटप जाहीर केलं. या वाटपानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मलबार हिल येथील वर्षा बंगला, छगन भुजबळ यांना रामटेक बंगला, जयंत पाटील यांना सेवासदन, तर एकनाथ शिंदे यांना राॅयलस्टोन बंगला निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

हेही वाचा- मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक? बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेणार

उर्वरित ३ मंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना अद्याप बंगला उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थान सोडून वर्षा निवासस्थानी जाणार की नाहीत? अशी सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु गरज असेल, तेव्हा कामकाजासाठी वर्षा बंगल्यावर जाईन, असं स्पष्टीकरण ठाकरे यांनीच दिलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या