सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा, पण करावं लागणार इतकं काम

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (state government employees) ५ दिवसांचा आठवडा (5 day week) लागू करण्याचा शासन निर्णय सोमवार २४ फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार येत्या २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू होणार आहे.

राजपत्रित अधिकारी (gazetted officer) महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा- ५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद

या शासन निर्णयात ५ दिवसांचा आठवडा (state government employees) राज्य शासनाच्या (maharashtra government) कुठल्या विभागातील कर्मचाऱ्यांना लागू असेल आणि कुठल्या कर्मचाऱ्यांना लागू नसेल, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना दररोज किती तास (working hours) काम करावं लागेल, हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. या शासन निर्णयातील महत्त्वाचे नियम बघूया, 

  • २९ फेब्रुवारी, २०२० पासून शासकीय कार्यालयांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.
  • सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील.
  • तसंच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी राहील.
  • या कायालयीन वेळेमध्ये दिनांक ४ जून, २०१९ च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असेल.
  • ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना ५ दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत. 
  • ज्या कार्यालयांना ५ दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही, त्या कार्यालयांची यादीही प्रशासनाने शासन निर्णयासोबत प्रसिद्ध केली आहे.   

सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना कृषी राज्यमंत्री बच्चू कडू (agricultural state minister bacchu kadu) यांनी ५ दिवसांच्या आठवड्याला विरोध केला होता. ५ दिवसांचा आठवडा (5 day week) करण्याऐवजी २ दिवसांचाच आठवडा करा आणि उरलेले दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी. ५ दिवसांचं काम ते २ दिवसांत करत असतील तर काय हरकत आहे. मुळात काही सरकारी कर्मचारी किती काम करतात हा प्रश्न आहे. काम करणाऱ्या आणि काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन कधी होणार की नाही? ५ दिवसांचा आठवडा लागू होऊ शकतो, तर मग पगारही कामावर आधारितच द्यायला हवा, असं बच्चू कडू म्हणाले होते.

हेही वाचा- आता ५ डे वीक! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर

पुढील बातमी
इतर बातम्या