Advertisement

५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (state government employees) २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा (5 day week) लागू केला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद
SHARES

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (state government employees) २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा (5 day week) लागू केला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, सरकारच्या निर्णयावरून सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहेे. कृषी राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी ५ दिवसांचा आठवडा करण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. 

कृषी राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) हे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवत असतात. ५ दिवसांचा आठवडा करण्यास विरोध करताना बच्चू कडू म्हणाले की, ५ दिवसांऐवजी २ दिवसांचाच आठवडा करावा आणि उरलेले दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी. ५ दिवसांचं काम ते २ दिवसांत करत असतील तर काय हरकत आहे. मुळात काही सरकारी कर्मचारी किती काम करतात हा प्रश्न आहे. काम करणाऱ्या आणि काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन कधी होणार की नाही? ५ दिवसांचा आठवडा लागू होऊ शकतो, तर मग पगारही कामावर आधारितच द्यायला हवा.

तर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सरकारच्या या निर्णयाचं समर्थन करून म्हणाले की, ५ दिवसांच्या आठवड्यामुळं मंत्रालय एक दिवस बंद राहील. त्यामुळं विविध सुविधांवर होणार एका दिवसाचा खर्च वाचेल. कामावर आधारित पगार देण्यासाठी कुठला थर्मामीटर लावायचा? किती डिग्री काम केलं हे मोजता येईल काय, अशी विचारणा त्यांनी कामावर आधारित पगार देण्याच्या बच्चू कडू यांच्या मागणीवर केली आहे. हेही वाचा -

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील

राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा